Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Priti Dabade

Inspirational Others Children

3  

Priti Dabade

Inspirational Others Children

गणित

गणित

1 min
251


असतील पाढे पाठ जर

गणितच चुकत नाही मग तर


सूत्रांची व्यवस्थित मांडणी अन् आकडेमोड

देई पैकीच्या पैकी गुणांची भेट गोड


भूमितीच्या आकृत्या एकदा समजता

प्रमेय सुटतात वापरून कल्पकता


अवघड नाही अजिबात वर्गमूळ, घनमूळ

गणिताचे भय हेच आहे मोठे खूळ


आहे सोपा तसा गणित विषय

करावा लागत नाही पाठ आशय


Rate this content
Log in