Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

गळून गेले माझे मी पण

गळून गेले माझे मी पण

1 min
1.4K


गळून गेले माझे मी पण

अनुभूतीला सारे अर्पण ।।


जरी म्हातारा मी बिनकामी

येईल आठवण क्षणोक्षणी ।।


दरात सजवती मांडव भारी

मला बसवती मंदिरा वरी ।।


सारे झाले स्वार्थी मतलबी

कामा पुरती गोडी गुलाबी ।।


तोंडापुरती करता हळहळ

चालायचा तो चालतो छळ ।।


घरात पाहीजे हसरे चहरे

मायबाप म्हणे आश्रमात बरे ।।


वृद्ध बिचारे देती शाप

फेडावे लागेल तुम्हा पाप ।।


मानवा हीच तुझी करणी

करावी लागेल तुला भरणी ।।


गळून जाईल तुझे मी पण

तुला होईन त्यांची आठवण ।।


Rate this content
Log in