गझल
गझल
चंद्र ताऱ्यांस दिवसा कसे शोधतो
भास नुसते मनाचे उगा पाहतो
ऐकला का कुणी आज टाहो इथे
कर्ज डोक्यावरी बघ बळी वाहतो
आज दुनिया किती त्रस्त पाण्याविना
रोज आक्रोश मी सारखा ऐकतो
का बरे तू अशी सोडचिठ्ठी दिली
आठवांनी तुझ्या आसवे गाळतो
थाटले घर नवे पाखरांनी इथे
छान संसार तो बघ कसा चालतो