Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

MEENAKSHEE P NAGRALE

Abstract Fantasy Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Abstract Fantasy Others

गझल

गझल

1 min
355


पाहिले मी लोक जेथे भाळणारे

पाहिले मी लोक तेथे टाळणारे


फायदा सांगून नाही माणसाला

आणती लटकेच अश्रू ढाळणारे


काम त्यांचे आडले की पाय धरती

गोड भाषा शब्द येती पाळणारे


कोण नाही रे कुणाचे ठेव ध्यानी

भेटती का रोज येथे जाळणारे


संपता हव्यास रात्री माणसाचा

लोटती का दूर गजरा माळणारे


Rate this content
Log in