गौरी विसर्जन
गौरी विसर्जन
गौरी विसर्जन
आली आली गोराई
सोबत बाळाला घेऊन
कळलेच नाही कधी
गेले अडीच दिवस होऊन
वेळ आता विसर्जनाची
गौराईला सासरी जाण्याची
गोड धोड खमंग काहीतरी
चिवड्याची मजाच न्यारी
सोळा भाज्यांची थोडी
त्यात लाडू ची वेगळीच गोडी
स्त्रियांची लगबग सारी
गौरी पूजन ची जबाबदारी
वेळ आता निरोपाची
प्रतीक्षा पुन्हा पुढच्या वर्षाची
हसत मुख सासरी चालली
स्नेहाने घरभर साजली
स्त्रियांनी सजवले मंदिर घरी
गौराईच्या पूजेची जय्यत तयारी
विसर्जनाचा क्षण हा आला
ह्रदयपूर्वक निरोप घेतला
आली आली गौरी
मंगलमय सर्वांची साजिरी
पारंपारिक संस्कृतीचा सण
स्नेहाचा संदेश करा जतन....
✍️
कवी - ज्ञानेश्वर आल्हाट
९६७३१५८३४३
पुसद
