गाव आणि शहर
गाव आणि शहर

1 min

11.6K
गावाकडचा जिव्हाळा गावातच मिळतो
कॉँक्रिटच्या जंगलात माणूसच हरवतो
गावाकडे मिळते बघाया खूपच हिरवळ
शहरात जावे लागते बागेत झटकण्या मरगळ
गावात असते हिरवा निसर्ग नि गर्द झाडी
शहरात सगळेच रस्ते नि उंच उंच माडी
गावात मिळतो स्वच्छ मोकळा वारा
शहरात वाढलाय खूपच प्रदूषणाचा पसारा
गावी असते माणसामाणसात आपुलकी
शहरात आढळते सभ्यतेची फुशारकी
गावातील शेतीमुळे जनजीवन सुरळीत
शहरी औद्योगिकीकरण मुळे प्रगतीही साधलीच