गाऊ गीत गारव्याचे
गाऊ गीत गारव्याचे
1 min
69
अष्टाक्षरी रचना
शहारल्या तरुवेली
थेंब दवाचे सजले,
चकाकती पर्णफुले
गाली गुलाब फुलले
शिशिराची थंड हवा
दाट चादर धुक्याची,
शिरशिरी अंगावरी
उठे काटा तनावरी
मंदस्मित गंधाळला
मरुताचा सभोवती
गीत गाऊ गारव्याचे
चंद्रबिंब आसमंती
लागे चाहूल निशेची,
संध्याछाया प्रकाशली,
थंडी गुलाबी धुंदीची,
रातराणी मोहरली
रविराज नभांगणी
लाल चमके तेजाचा
सोबतीला थंड हवा,
लाभ होतो दर्शनाचा
मोह सारूनी मनाचा,
आरोग्याची संपन्नता,
हवामान अनुकूल
साधू प्रमाण गेयता