गाजर
गाजर
गाजर बाजारात आलं
की समाधान वाटायचं
घरी कधी आणू अस
सदा वाटायचं
बाहेर पडताना गाजर आणा
असा आदेश व्हायचा
घरी येताच पिशवीचा
ताबा पोरांनी घ्यायचा
हे असंच चालायचं
उरलं सुरल तर गाजर
इतर गोष्टींसाठी
चुकून माकून हाती लागायचं
नाहीतर बिन बोबाट
गाजराच रुपांतर
ज्याच्या त्याच्या नशिबाने
वेगवेगळ्या पदार्थात व्हायचं
कधी गाजराचा हलवा
कधी गाजराच लोणचं
नाहीतर कधी गाजर कोशिंबीर किंव्हा भाजी
नाहीतर कधी गाजर वडी
अस बहु आयामी गाजर
आजही मनास भुरळ पाडत
गाजर नसेल तर कधी कधी
खरच अस वाटत घोड आडत....!!!