Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

एका अहंकारापायी

एका अहंकारापायी

1 min
136


वर्षानुवर्ष रावणाचे

 दहन का करायचे

 एका चुकीसाठी त्याला

 पुन्हा पुन्हा मारायचे

अहो इथे करोडो ने

 भ्रष्टाचार करतात

 तुरुंगात जाऊन पुन्हा

 जामीनावर सुटतात

 खुनासारख्या गुन्ह्याखाली 

 आरोपी तुरुंगात जातात

 इलेक्शनला पुन्हा 

  तुरुंगातूनच उभे राहतात

 त्यांच्यासाठी आता

 कोणत्या  शिक्षा करणार

 लाखों चुकांना त्यांना 

पुन्हा पुन्हा माफी करणार

 असेच लोक जनतेमध्ये

   अगदी हिरो बनतात 

बिचाऱ्या रावणाला मात्र

 पुन्हा पुन्हा मारतात

 रावण कोणी असा

 ऐरा गैरा नव्हता

 तो पण दशग्रंथी

 ब्राह्मण होता 

चारी वेदशास्त्रे अठरा पुराने

 त्याची होती मुखोद्गत

 पण अहंकाराचा

 किडा चावल्याने

 लंका केली स्मशानवत


Rate this content
Log in