एक नांव
एक नांव
1 min
63
एक नांव लागली पैलतीरा अन्
एक नाव आज पडले मागे..!
एक दोर अजुनी तुटला नावेचा अन्
एक नाते आता पडले मागे..!
एक नाव आणिक गेले मिटूनी अन्
एक गाव माझे पडले मागे..!
एक वार झाला पुन्हा नियतीचा अन्
एक वार मी पोरका पडलो मागे..!