एक घट्ट मिठी
एक घट्ट मिठी
एक घट्ट मिठी,
दुःखाला ही मारून घ्यावी.
डोळ्यातून अश्रू गाळत बसण्याऐवजी,
दुःखाची एकांतात भेटं घ्यावी.
एक घट्ट मिठी,
दुःखाला ही मारून घ्यावी.
दुःखासोबत मैत्री करून,
एकमेकांची व्यथा समजून घ्यावी.
एक घट्ट मिठी,
दुःखाला ही मारून घ्यावी.
दुःखाच्या तालाशी,
हास्याची सवरमालिका जुळवून पहावी.
एक घट्ट मिठी,
दुःखाला ही मारून घ्यावी.
मनाची दुःखासोबत,
आयुष्यभरासाठी रेशीमगाठ जुळवून पहावी..