एक दिवस
एक दिवस

1 min

17
स्वत:शीच बोलायला हवं कधीतरी,
भावनांचे कल्लोळ बाजूला सारून...
एक दिवस जगा की मनमोकळे पणाने,
किती दिवस राहणार मन मारून...
मनसोक्त भिजा या पावसात.
लहानपणी चिखलात खेळायचोच ना..?
मग एक दिवस लहान व्हायला काय हरकत आहे...
विचार कशाला करायचाय कोणाचा..?
असं समजा दुनीयेशी आज फारकत आहे...
खरच एक दिवस जगूयात पुन्हा,
दिवस ते मंतरलेले...
ऊनाडक्या करत फिरलेले...
चिखल-मातीत लोळलेले...
घट्ट मैत्रीत फुललेले...
चिंब पावसात भिजलेले...
अशा कितीतरी गोष्टीत रमलेले...
खरंच जगुयात का ते दिवस हरवलेले...