Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vijay Sanap

Tragedy

4.1  

Vijay Sanap

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
453


असा पडला दुष्काळ

गेल्या विहीरी  आटून

नद्या साऱ्या वांझ झाल्या

बसे  डोंगरा  खेटून ।।


गाव येथे दुष्काळानं 

होरपळलाय  सारा

गायी वासरं उपाशी

कोठे मिळेना रे चारा ।।


सारी भूई भेगाळली

उभी राहून उन्हात

तुझी मानवा करणी

कसं येईना ध्यानात ।।


झाडे हिरवी हिरवी

माना लागली टाकू

पिढ्या गणतीचा वड

कमरात लागे वाकू ।।


होता दुष्काळ पूर्वीही

नित सरी झडायच्या

उभ्या ओसरीच्या भिंती

अचानक  पडायच्या ।।


Rate this content
Log in