Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mita Nanwatkar

Abstract Fantasy Inspirational

3  

Mita Nanwatkar

Abstract Fantasy Inspirational

दुरावा

दुरावा

1 min
975


दुरावा संपून आता,रोज दिवाळी दसरा आहे

सुगंधित सहजीवनाचा,मोहरतो गजरा आहे

तुझ्या माझ्यात आता,अल्पसा किनारा आहे

आपल्या मनोमिलनाचा,फुलतो मोगरा आहे

नियतीनेच दिलेला,खास असा इशारा आहे

बेमुदत प्रतिक्षेचाच हा,विझतो निखारा आहे

दुखःद संवेदनांचा मी,गुंडाळला पसारा आहे

तुझ्याच स्वप्नांचा इंद्रधनू,करतो पहारा आहे

ऐतिहासिक भेटीस त्या,साक्षी वसुंधरा आहे

सुसंवाद कल्पनेनेही,जीव होतो बावरा आहे

तुझ्याच प्रीतमहालाचाच,आता सहारा आहे

सोबतीच्याही आभासाने,उठतो शहारा आहे

तुझ्याच भोवती फिरणारा,माझा भोवरा आहे

सुखद आठवांचा सख्या,साचतो निकरा आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract