दिवाळी
दिवाळी
1 min
13.5K
दिन दिन ही दिवाळी
सुख घेऊनिया आली
घरे-अंगणे सजली
छान आरास ही झाली
फुले पिवळी झेंडूची
डोले तोरण दारात
वाढे गोडवा नात्यांचा
तेवे प्रेमाचीच वात
होई सांजवेळ जशी
लावू पणत्या ओळीत
येई लक्ष्मी पावलांनी
सौख्य भरेल झोळीत
गोडधोड फराळाने
होती आनंदी सगळे
दिवाळीच्या उत्सवाचे
आहे महत्त्व आगळे
होई दिवाळी तेजस्वी
मिटे अंधार मनाचा
नसे दुःखाचीही छाया
वाढे हर्ष जीवनाचा