दिसे साजरे गोजरे
दिसे साजरे गोजरे
1 min
198
दिसे साजरे गोजरे
रूप राजस मोहक,
मूर्ती प्रसन्न हसरी
डोळा तेज अलौकिक.
शोभे गोंड्याचे मुकुट
शिरावरी लखाखत,
शेला पांघरा जरीचा
स्वामी बसा दिमाखात.
घेई करवूनी सेवा
तुम्ही देवा स्वामीराया,
गुरु माऊली समर्था
ठेवा डोई छत्रछाया.
असे बालक अजाण
द्यावे आम्हा ज्ञान देवा,
मार्गदर्शन मोलाचे
द्यावा अनमोल ठेवा.