दिन दिन दिवाळी
दिन दिन दिवाळी
1 min
398
घरासमोर अंगण
अंगणात शेणाचे
सारवण
त्यात रेखिली
सुबक रांगोळी
ओटी वरचा
आकाश कंदिल
मंद तेवणारी पणती
उटण्याचा सुगंध
खमंग फराळाचा
दरवळणारा सुवास
थंडीचा गारवा
करी हितगुज
आली दिवाळी,
आली दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
कष्टकरी
शेतकरी.