दिले दाखवून अस्तित्व...
दिले दाखवून अस्तित्व...
चूल आणि मूल होतं
एवढंच तिचं विश्व ,
शिकून घेतली झेप
दाखविले स्त्रीने अस्तित्व...
जगतास जन्म देणारी
असे महान ती नारी,
तिच्या मुळेच दुनिया सारी
जगातास ती उध्दारी..
शब्दात काय वर्णावी
नारी तुझी महती
तुझ्याच पोटी जन्म घ्यावा लागतो
असला देव जरी तो किती..
तुझ्यामुळेच आहे
पुरुष, पुरुषार्थ,
तुझ्यामुळेच जीवन
या जीवनास अर्थ.
तूच जननी, तूच धरणी
तूच सर्व शक्ती,
भक्ती, मुक्ती, प्रीती तू
तूच सर्व प्राप्ती.
तूझी अगाध लिला
तुझा थोर महिमा,
अबला न सबला तू
पुजनीय तूच आम्हा.
असे जगी श्रेष्ठ
तुझं मातृ रुप,
तुच जगी पुण्य
बाकी जगात पाप..
आज येते खरी
आई तुझी आठवण,
आई तुझ्यामुळेच
आहे जीवन मरण...