Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

ध्येय

ध्येय

1 min
197


काम असे कठीण नसे अशक्य 

पूर्णविरामानंतर तयार होई नवीन वाक्य 

दोष न दे नशिबी प्रयत्नांना मुकू नको 

अरे वेड्या ध्येय मात्र सोडू नको 


असंख्य आपले वैरी नको त्यांची भ्रांत

लक्ष्य ध्यानात ठेवून तू चाल निवांत 

शत्रूंची भीती बाळगून मान झुकवू नको 

अरे वेड्या ध्येय मात्र सोडू नको 


चंचल मन नाही स्थिर 

हरलो तरी न सोडे धीर 

घेतलेला वसा विसरू नको 

अरे वेड्या ध्येय मात्र सोडू नको 


स्वप्नपूर्तीचे ध्येय तुझे 

विजयी डंका सर्वत्र बाजे 

अर्ध्या वाटेवरून परत फिरू नको

अरे वेड्या ध्येय मात्र सोडू नको  


जन्माला येऊनी घे जगून 

नको न बघू मागे फिरून 

सामान्य माणूस म्हणून मरू नको 

अरे वेड्या ध्येय मात्र सोडू नको 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational