ध्येय
ध्येय
ध्येय
जन्म घेतला माणसाचा
श्रेष्ठ असे या जगामध्ये
शेवट ही तसाच व्हावा
ध्येय असावे मनामध्ये।।१।।
ध्येयामुळेच आयुष्याला
सुंदरसा आकार मिळे
दुःखाचे ढग जीवनातले
चुटकी सरसे दूर पळे।।२।।
हळू हळू जीवन मार्गी
शांतपणे चालत जावे
कुठे जायचे हे मनात
नक्की करायलाच हवे।।३।।
डोळ्याविन ना दुजे दिसे
मत्स्यभेद करता पार्थाला
स्वयंवरात गळ्यात पडते
म्हणून यशाची वरमाला।।४।।
मनुष्य जीवन जगताना
व्रतस्थ होणे योग्य असे
जीवनात या उमटतील
तेव्हा यशस्वीतेचे ठसे।।५।।