Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajendrakumar Shelke

Comedy Fantasy

2  

Rajendrakumar Shelke

Comedy Fantasy

ध्येय

ध्येय

1 min
33


दिशा अचूक अन ध्येय प्रामाणिक

चालत रहा तू थांबू नको


होतील वार बघ बदनामीचे

तू बदनामीने खचू नको


रुसतील किती,हसतील कितीही

तू कर्तव्यावर रुसू नको


वैरी होतील अनेक इथेही

तू गुन्हेगार कधी दिसू नको


करतील कपट आपलेच मतलबी

 कपटात इथे तू फसु नको


मिळेल कधी जरी ध्येय तुला ही

मग इतरांवर तू हसू नको


विश्वास ठेवुनी कर्मावरती

 उठ चाल पुढे तू बसू नको


दिशा अचूक अन ध्येय प्रामाणिक

चालत राहा तू थांबू नको

चालत राहा तू थांबू नको


Rate this content
Log in