Ravindra Gaikwad

Others


4  

Ravindra Gaikwad

Others


धोका

धोका

1 min 0 1 min 0

आता माणसाला कळला माणसाचा धोका

जवळ नका जाऊ कोणाच्या दूर राहा बरं का !


कोण चांगला कोण वाईट कसं कुणास कळावं ?

किती कोणाच्या जवळ जावं कसं कुणास टाळावं?


बरी नाही ही साथ संगत नको दुसऱ्याची लागण

स्पर्श सुधा नको कुणाचा होई कठीण जगणं.


जवळचा, दूरचा काही नाही आहे माणसाचा धोका

घ्या खबरदारी, राखा स्वच्छता उगीच घाबरू नका.


भिती माणसांची किती माणसाला घरातच जनता सारी आहे

ज्यांचा त्यानं करावा विचार ही तर महामारी आहे.


माणसापासून दूर माणूस लागलाय आज पळायला

खरंच माणूस वाईट आहे लागलय सर्वांनाच कळायला.


माणसासारखे वागा रे माणुसकी जपावी थोडी

अहंकार दया सोडून मर्दांनो असूद्या तुमच्यात गोडी.


पुण्य घडावे हातून थोडं, लई पाप करु नका

खऱ्या माणसाला नाही या कोरोनाचा मुळीच धोका...!


Rate this content
Log in