देवा तुह्या भेटीसाठी
देवा तुह्या भेटीसाठी
बाप महा आनवाणी
फिरतो गं दारोदारी
देवा तुहया भेटीसाठी
करीपंढरीची वारी
गळया मधी घाली टाळ
गाणं तुपलच गाई
देवा तुहया भेटीसाठी
करी वारी पायी पायी
नाम घेता विठ्ठलाचे
मनी होतो रे आनंद
देवा तुहया भजनाचा
आम्हा लागूदे रे छंद
चंद्र भागेच्या रे तिरी
भक्त आंघोळ करती
आधी काकडा भजन
मग तुही रे आरती
नको आता मज काही
राहावे तुच माझ्या पाठी
येईन रे पंढरीला
देवा तुहया भेटीसाठी