देशभक्ती
देशभक्ती
देशभक्ती देशभक्ती
कुठे मिळते का विकत ?
काय मोल ,काय भाव
पावात की किलोत?
ज्याच्या त्याच्या तोंडी असते
देशभक्तीचीच बात
प्रत्यक्षात मात्र असते
बोलाची कढी नी बोलाचाच भात ॥
देशभक्तीचा आव तसा
सारेच आणत असतात
पण दिसत नाही कधी कुठे
देशभक्ती वागण्यात॥
नारे असतात देशभक्ती
गोड आणि गोजिरवाणे
वेळ आली पाळायची तर
होते पोकळ तुणतुणे॥
गात असतात सारेच
देशभक्तीचे गाणे
जीवनात मात्र असते
सारेच उणे उणे ॥
देशभक्ती काय एवढी
स्वस्त ती असते
नाही गड्या, ती तर
आपल्या रक्तातच असते ॥
मोठमोठ्याने ओरडून
सांगता येत नसते
लपवतो म्हटल तरी
लपवता येत नसते ॥
जात, धर्म ,प्रांताची
वाली ती नसते
ती फक्त आणि फक्त
देशासाठीच असते ॥
देशभक्तीचा बागुलबुवा
उभ करणं सोपं असते
पण देशासाठी जीव देणं
क्रांतिकारकालाच जमते ॥
म्हणूनच
देशभक्ती कधी ती
मिळत नसते उसण्यात
मुळात ती असावी लागते
आपल्या नसानसांत ॥