Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aasavari Ainapure

Abstract

3  

Aasavari Ainapure

Abstract

डॉक्टर दिन....

डॉक्टर दिन....

1 min
240


देवदूत हो अमुचे तुम्ही 

तुम्हास वंदन आज करतो

अढळ राहो तुमची निष्ठा 

सतत स्मरण हे तिचे करतो 


काळ असला जरी कसोटीचा 

मागे तुम्ही हटत नाही 

रुग्णसेवा ही अविरत देता 

पर्वा स्व-जीवाची करत नाही 


पेशा जरी असला अखंड सेवेचा 

प्रसंग येतच असतील मोठे कठीण

मात करून त्या प्रसंगांवरती 

जिद्द तारून नेई तुम्हा प्रतिदिन 


भान जगण्याचे, भान जगवण्याचे 

भान रूग्णसेवेच्या अखंड व्रताचे

भान जबाबदारीने वागण्याचे

देते समाधान आयुष्यभराचे


अनंत असती उपकार तुमचे

आजाराशी लढण्या बळ हे दिले 

उपचार करून रुग्णांवरती

एक नवे जीवनदान दिले


दानाची या महती मोठी 

पुनर्जन्मच जणू तुम्ही दिला 

खरं सांगतो, डॉक्टर तुमच्यांत 

आम्हा सर्वांनाच देव दिसला 


देवाचे हे रूप आता

आम्ही फक्त मनी साठवतो 

डॉक्टर नावाच्या देवदूताचे 

अनंत उपकार कायम स्मरतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract