STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Comedy Drama Tragedy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Comedy Drama Tragedy

दारोड्याची बायको...

दारोड्याची बायको...

1 min
0

एका दारोडयाची बायको वडाला फेऱ्या मारत होती,
जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा हे मागणं मागत होती.

 मी म्हणालो,माऊली खरं सांग असं हे काय..
ती म्हणाली, यांच्या सोबत दुसरी नांदनारच न्हाय.

 याची दारू सोडून ह्याला माणूस बनवणे, संसार सुखाचा करणे ह्यातच माझ्या जन्माच खर सार्थक हाय...

 हे सारं जेंव्हा त्या कळलं दारुडयाला तोच वडाभोवती फेऱ्या मारु लागला

 मी त्याला विचारलं हे असं कारे बाबा,
तो म्हणाला, मी सोडली दारु हे तोबा तोबा.

 तो म्हणाला बायको माझी खरी आहे लक्ष्मी,
सोडून व्यसन करू संसार नाही पडणार काही कमी.

 बायको वडाला फेऱ्या मारताना पाहून भलं एवढं तरी व्हावं
प्रत्येक नवऱ्यानं सुख जन्मभर द्यावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy