Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

चवणेश्वराची महती

चवणेश्वराची महती

1 min
287


डोंगराच्या पायथ्याशी

 सुंदर माझे खेडेगाव

 सातारा जिल्ह्यातील

 करंजखोप त्याचे नाव


 गावाच्या चहुबाजूंनी

 ओढा वाहतो झुळझुळ

  गच्च झाडी मधून 

पक्षी गातात मंजुळ 


गावाच्या सीमेवर रक्षणा

 मारुतीराया उभा

 समोर झाड अशोकाचे

 पार वाढवितो शोभा


 डोंगराचे नाव चवणेश्वर

देव चवणेश्वर उभा गडावर

 वरती असे एक बारव सुंदर

 उन्हाळ्यातही देई गोडपाणी थंडगार


अश्विन आपल्या चौथ्या रविवारी

देवाच्या जत्रा भरती

 गावातही सुंदर देऊळ 

काय सांगू त्याची महती


डोंगरावरती जाताना लागते

 झाड एक आंब्याचे

म्हणती तेथे स्थान आहे

 देवा चवणेश्वराचे 


जत्रे दिवशी वरती जाताना

फक्त आंब्याचा मोहोर दिसतो

 जत्रा संपवून खाली येताना

 कैरीने आंबा भरून जातो


जाताना तुम्हाला दिसणार नाही 

एकही कैरी झाडाला

 खाली येताना बघाल तर

 आंबा आलाय पाडाला


कैरीचे घोस  बांधतात

 देवाच्या पालखीला

संचारतात अंगात वारे जेव्हा

 निघतो देव मिरवणुकीला


या माणसांना सारे देव

 आले असे म्हणतात

नसतेच भान कोणाचे

 कड्यातूनही उड्या मारतात


त्यांना साधे खरचटत नाही

 काहीच होत नाही त्रास

 देवा चवणेश्वराची 

 हीच आहे ख्याती खास


Rate this content
Log in