Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Children Stories Tragedy

3  

AnjalI Butley

Children Stories Tragedy

चटका

चटका

1 min
191


पायाला चटके बसले तरी

फिर-फिरायचे आंबे तोडण्या 

दुपार अशा उनाड मुलांची

बघताच त्याच्या मनाला बसला चटका...


भोगलेल्या शिक्षा अशा खास

कान-धरून ऊन्हात उभे राहण्याच्या

बसता पाठीत धपाटा घ्यावे देवाचे नाव

आठवताच ते दिवस 

डोळ्यात तरळते पाणी आज ही...


ती माऊली नसती आली समोर

मला समजवण्यास तेंव्हा

उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळण्या सोबतच करावा अभ्यास

मार तीच्या हातचा खात केला मी अभ्यास...


पालटले माझे नशिब

करत गेलो अभ्यास 

बनलो एक दिवस साहेब

म्हणत तीला, तुझेच उपकार...


बघता अशी उनाड पोरे

चटका बसतो मनाला

आवरत स्वतःचे मन

देतो त्या उनाड मुलांना शिक्षणाच्या महत्वाचे दोन डोस...


Rate this content
Log in