चंगळ
चंगळ
बालक मी आधुनिक
करतो युक्त्या अफलातून
करामती माझ्या जगावेगळ्या
जन्मदात्यांनो घ्या समजून.....१
आटपाटनगर च्या विश्वात
जगत नाही मुळीच मी
संगणक, फेसबुक,इंटरनेट
शिवाय राहुच शकत नाही मी.....३
नोकरीसाठी पडता बाहेर
सोबतीला माझ्या कुणीही नसे
आंतरजाल ज्ञानाचे भांडार
एकमेव सोबतीस कायम असे.....३
झुगारून समस्त बंधने
होतो रममाण मी विश्वात
बालपणी माझे सोबती
कृत्रिम बाबी या जगतात....४