चंद्र सूर्य
चंद्र सूर्य
( सहाक्षरी )
संगत सूर्याची
आवडते मला
चंद्राची आवड
नेहमीच तुला......
ओलेचिंब अंग
घामाचाच गंध
एसी शितलता
कृत्रिम सुगंध...
अनवाणी चाल
चालणे आमचे
सफर गाडीची
फिरणे असते.....
खुखाचा ढेकर
पोट हातावर
खाणे ते सलाड
पाय पोटावर....
क्षितिजाची ओढ
आहे स्वप्न डोळा
चंद्राच्या चांदण्या
छतालाच खेळा