चित्रकाव्य
चित्रकाव्य
घेती खग आकाश झेप
दिसते दृश्य ते विहंगम |
शिस्तबद्ध रांगेत उडणे
सौंदर्याचा अनोखा संगम | |१| |
निळ्या विस्तीर्ण आकाशात
दिसते त्यांची भरारी छान |
आकाशाच्या भाळावर जणू
केलीय त्यांनी सुरेख कमान | |२| |
जमिनीवरुन आकाशात खग
पंख पसरून तरंगत जाती |
आकाश आणि जमिनीशीही
त्यांनी जोडून ठेवलीय नाती | |३| |