चिकटलेला प्राण
चिकटलेला प्राण
1 min
150
कुणाची नाही
सुटका कधीच
कुंपणात राही
काटे मधीच
त्याला ओलांडून
जरी घुसलं
ताऱ्यात अडकून
आत ओढलं
सरळ नागमोडी
गाठी घालून
आत वाकडी
स्वतःस बांधून
प्रवाह त्यातला
उतरत जातो
त्याला चिकटलेला
प्राणास मुकतो