Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Fantasy

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Fantasy

चाहूल

चाहूल

1 min
261

ऊन मी म्हणत असतांना सुसाट 

वा-यासवे येते पावसाची चाहूल |

काळ्या मेघांच्या गर्जनेसह त्याचे 

अंगणात पडते पहिले पाऊल | | १| |

शेतकऱ्यांची बी पेरणीपूर्व जमीन

 नांगरणीची लगबग होते सुरू |

भेगाळलेल्या भुईमध्ये पावसाचे

पाणी नकळत लागतं मुरू | | २| |

येतं तरारुन अंकुरित बीज हिरव्या 

रंगाचं वस्त्र पांघरूण धरणीला | 

काय म्हणावे कळेना मूळीच बाई

निसर्गाच्या या अनुपम करणीला | |३| |

पशू पक्षी झाडं वेली सारी सृष्टीच

पावसाची आतुरतेने पहाते वाट |

चाहूल लागताच त्याची वाऱ्यासवे

येते हलकेच मृद्गंधाची लाट | |४| |

हर्षाने न्हाते सृष्टी साहित्यिकांच्या

कल्पनाशक्तीला येतो बहर खूप |

तृषार्त चातकाची भागते तृष्णा नि

साऱ्या सृष्टीचं सुखावतं रुप | |५| | 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract