चाहूल
चाहूल
चोर पावलांनी तू
हळूहळू येव लागली
चाहूल तुझ्या येण्याची
त्याला कळू लागली
तो तुला बघतोय
वळून तू बघायची
कोण बघतय बघण्यासाठी
तू किती किती शोधायची
त्याला बघायला पावले तुझी
इथेतिथे पळू लागली
त्याच्यासाठी नजर तुझी
चौफेर वळू लागली
दिसत नव्हता तुला तो
तू बावरी व्हायची
त्याला भेटायला तू
दुर जावून बघायची
पाहून त्याला नजर तुझी
तुला छळू लागली
हसऱ्या गालावर तू
अश्रु ढाळू लागली