Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

BABAJI HULE

Others

3  

BABAJI HULE

Others

बस्ता

बस्ता

1 min
141


विवाह बंधनात एक मानापमानाचे नाट्य म्हणजे बस्ता 

आवश्यक असणारी खरेदी परंतु खिश्याला बसतो मात्र खस्ता II


दुकानदारांची स्वागत पद्धत एक जगावेगळी 

गाद्यांवर बसवून किंमती कपड्यासोबत चहा मिळेल वेळोवेळी II


बरोबरीच्या पाहुण्यांचा चंगळवाद मात्र खरा 

लेकीच्या सुखासाठी स्विकारावा लागतो जावयाचा तोरा II


प्रत्येक समारंभाचा रंग माझा वेगळा 

साखरपुड्याचा निळा आणि हळदीचा पिवळा II


लग्नाचा शालू हवा हिरवा भरजरी 

पहिल्या पाठवणीला चालेल चंदेरी सोनेरी  II


अंतर्वस्त्राची निवड रंगी बेरंगी आणि न्यारी 

माहित नाही या अगोदर कधी घेतली होती का भारी II


चप्पल आणि बुटांचा साजच आगळावेगळा 

कोणताही रंग चालेल परंतु नको ढवळा काळा II


आजचीर, वर-ओवाळणी आणि नणंदेचा हक्क मानाचा 

वरमाईची हौस व छोट्यांची चंगळ पण वरबाप मात्र खादीचा II


बस्त्याची खरेदी म्हणजे क्षण राग-रुसव्यांचा 

परंतु तरीही नात्यानात्यातील ओलावा जपण्याचा II


बस्त्यातील खरेदी ही एकमेकांवरची कुरघोडी की खरंच पसंती 

पण हीच तर खरी सुरवात एकमेकांच्या आवडी-निवडींची II


विवाह-संस्कारांतील एक अविस्मरणीय क्षण म्हणजे बस्ता 

दोन घराण्यांच्या नात्याला आकार देत वाढवतो प्रेमाची आस्था II


Rate this content
Log in