Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Devkar

Abstract

3  

Supriya Devkar

Abstract

बोलणार आहे

बोलणार आहे

1 min
184


बोलणार आहे आज मी 

तू कितीही थाबंवशील मला 

साचलेल्या आठवणींना 

सांगायचय आज तुला॥१॥ 

बालपण सरले सारे 

कोवळे मन झुलले सदा 

अलवार डोलले वेलीवरती 

बागडले अंगणी सदा ॥२॥

बोरं चिंचा खूप चाखल्या 

संवंगड्यांच्या सोबत 

आईबाबांना पाहीले 

संसारासाठी राबत॥३॥

बघता बघता आले तारुण्य 

सौंदर्याने मोहरले मन 

प्रेमात पडता तुझ्या

रोमांचित झाले अवघे तन ॥४॥

बहरला संसार आपुला 

फुलले गोकुळ दारी 

जवाबदारीची शाल 

घेतली पांघरून सारी ॥५॥

बघ सारे रूळले आहे 

आता काढ वेळ जरासा 

थोडे तुझे थोडे माझे

अध्याय ऐकू या जरासा॥६॥ 


Rate this content
Log in