बनावे शिवाजी
बनावे शिवाजी




साहस व प्रयत्नांची लावूनी पराकाष्ठा नेहमी म्हणत,
तशी यावेळी ही लावू पणाला जिवाची ही बाजी।
माहित आहे, कमी पडेल हेआयुष्यपण प्रयत्नांमधून बनावे शिवाजी।
असंभव, कुविचारांशी लढण्यास व्हा राजी,
ऊसळा तलवार शिवविचारांची आणि बना शिवाजी।
सुविचारांचा करा व्यवहार, पण बिनव्याजी,
पुन्हा फिरू द्या सह्याद्रीत वारा तो अन् बना शिवाजी।
जातींमध्ये न अडकून पेटवा पुन्हा ती वात तेजाची,
राहू द्या अंधार कितीही पेटवून स्वतःला, बना शिवाजी।