बहरला पारिजात
बहरला पारिजात
पडे शुभ्र प्राजक्ताचा
सडा पहाटे अंगणी
फुले धवल कोमल
मज मोहविती मनी
रंग शुभ्र सुमनांचा
प्रफुल्लित चित्तवृत्ती
झाड डवरुन येता
वेचावया त्वरे जाती
रंग केशरी देठाचा
वर्धितसे जोश मनी
शुभ्र केशरी फुलांची
हाती ओंजळ भरुनी
बहरला पारिजात
हलकासा सुकोमल
रश्मीकिरणांची प्रभा
इरा सुगंधी धवल
फुले नाजुक साजुक
तयां आयुष्य दिनाचे
परि रंग सुगंधाने
जिणे सार्थ सुमनांचे