भक्ती
भक्ती
जाई जुई अन् शेवंती
भरगच्च फुलांचा वेल
जाई सुगंध आसमंती
कोण लावी सुगंधी तेल !!
गंध पसरला दारात
फुलबाग माझी फुलली
गंध अक्षत फूल देवा
पुजा संपंन्नच जाहली !!
रक्षा पडे उदबत्तीची
टीळा लावला कपाळास
रक्षा करा , देवा प्रार्थना
शांतता मिळते मनास !!
मोदक ठेवले नैवेद्या
भक्षण करूया प्रसाद
मोदक भरे प्रार्थनेत
देवास घालू आर्त साद !!
अभंग ठेवावी ती श्रध्दा
तुटू न द्यावाच विश्वास
अभंग गाऊ शांत चित्ती
नकोच भक्तीचा आभास !!
(जाई .... फूल , जाणे, गंध .... वास , चंदन, रक्षा - राख , रक्षण, मोदक - मिष्टान्न , आनंद, अभंग - भंग न पावलेला, देवासाठी केलेली काव्य रचना)