भिकारी
भिकारी
पोटाला लागते भूक
ह्यात काय माझी चूक
पैसा लागतो जगायला
अन्न लागतं खायला
ना शिक्षण, ना डोकं
सारचं कसं रिकामं खोकं
पसरतो मी आशाने माझी झोळी
मिळावी मला तुमच्याकडून पोळी
भिकारी मला म्हणतात
शी घाण म्हणून माझा दुस्वास करतात
फुटपाथच माझं घर
उडवतात लोक माझी टर
कोणी टाकतात नाणी
ऐकून माझी गाणी
सुकून जातात ओठ
पण काय करणार बोलतं माझं पोट
