Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

भीमा तुझ्यामुळे

भीमा तुझ्यामुळे

1 min
352


एक ज्ञानज्योत लावली डाॅ. आंबेडकरांनी

नमन त्या सूर्यासमान तेजाला

ज्योतीच्या दिव्य तेजाने त्यांच्याच

अज्ञानरूपी अंधार दूर केला नमन त्याला....


दिनरात अभ्यास कसून केला

समाजात कर्तृत्त्वाचा मान मिळवला

शिकण्याच्या जिद्दिला सलाम त्यांच्या

जातीभेद तोडूनी सत्याचा मार्ग दाखवला....



रमाबाईंच्या साथीनं समाज घडवला

अंधश्रद्धा,गुलामगिरीला कात्री लावली

भीमा तुझ्यामुळे भारतात एकजूट झाली

 या नवसूर्याची किर्ती अजरामर राहिली....


अशा अजरामर तेजाने तळपला भीम 

माणुसकीचा धडा समाजाला शिकवला

 "राज्यघटनेचा शिल्पकार"हा अतीउच्च

किताब बॅरिस्टर होवूनी मिळवला......


मूक समाजाचा नायक आपण

ज्ञानमयी प्रकाश दिला आंबेडकरांनी

नमन करू या सारे या महामानवाला 

झळकतो आज भारत सारा दिव्यतेजांनी...


Rate this content
Log in