Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sarika Jinturkar

Abstract

2.8  

Sarika Jinturkar

Abstract

भेटणारा पाऊस...

भेटणारा पाऊस...

1 min
168


आवडतो मज तुझ्यासोबत भिजलेला पाऊस 

भिजतांना तुला पाहून लाजलेला पाऊस  


 निवांत मनाला छेडणारा पाऊस 

आठवणींच्या भोवऱ्यात वेढणारा पाऊस  


प्रत्येकवेळी नवे अनुभव देणारा पाऊस 

कधी रिमझिम कधी मुसळधार बरसणारा पाऊस 

 जगाला वेड लावणारा पाऊस 

शब्द अंतरीचे मनात फुलविणारा पाऊस

प्रत्येकवेळी नव्या रूपात भेटणारा पाऊस  


अवेळी शेतकऱ्यांना छळणारा पाऊस

गरिबाच्या झोपडीत गळणारा पाऊस 


वीज पडून कधी जीव घेणारा पाऊस

कधी नको ते दुःख देणारा पाऊस

टाळावसा वाटतो मग भेटणारा पाऊस

दाटून येतो डोळ्यांमध्ये आटलेला पाऊस...


Rate this content
Log in