भावभोळा विठ्ठल
भावभोळा विठ्ठल
1 min
154
आषाढ महिना | पंढरीची वारी
आस लागे उरी | भक्तांचिया (१)
सरला कोविड | तुझिया कृपेने
भक्त उत्साहाने | माहेराला (२)
हरीनाम गर्जे | पंढरीच्या वारी
भेटे उराउरी | वारकरी (३)
पालख्या पंढरी | आनंदे येतील
भजने गातील |एकमुखे (४)
भीमातीर भरे | आनंदा उधाण
भेटीलागी आण | बा विठ्ठला (५)
मागील उणीव | निघेल भरुन
आनंदे गाऊन | भजनांसी (६)
भेटेल भक्तांसी | विठाई माऊली
संकट साऊली | दूर करी (७)
भोळा भक्तीभाव | भक्तांचिया मनी
जाण मनोमनी | बा विठ्ठला (८)
भावाचा भुकेला | भक्तीची तहान
विठ्ठल महान | शब्दातीत (९)