भारतीय नारी,जगात भारी
भारतीय नारी,जगात भारी
डोईवर पदर ,कपाळी कुंकू
अंगी ल्यायली नऊवारी
भारतीय नारी, जगात भारी
हीच आम्हास उपमा प्यारी
मीच आई, मीच ताई
अनाथांची झाले मी सिंधुताई
मीच झाले शिवबाची जिजाऊ
अन् मीच खान्देशातील बहिणाबाई
मीच सई, मीच सोयरा
मीच झाले झाले सती सावित्री
रणांगणी करुनी शत्रुंचा पराभव
मीच झाले राणी दुर्गावती
मीच रखुमाई, मीच राधा
मीच संत सखू मिराबाई
मीच काली, मीच अहिल्याबाई
मीच झाले जनाबाई