बेभान
बेभान
त्या बेभान मनाला कधी कळलेच नाही
की चुकीची वाट ही धरली जाइल
काय चूक काय नाही
हे ठरवणं आता कठीण राहील
योग्य दिशेची शोध होती
वाट फक्त सद्भावणेची होती
वैरी वाऱ्यात सवरेल असं ते हृदय कणखर झालं
काटे पचवेल अस दणकट झालं
त्या बावरलेल्या मनाला एकदा समजूत घातली
योग्य वेळी योग्यच गोष्टी होतील
दडपण थोडं येणारच होतं
पण पुन्हा भटकणे आता पर्यायच नाही!