बाळ सानुले
बाळ सानुले
बाळ रानात काट्यांत
अलगद पहुडते
तेज प्रखर रवीचे
कसे निमूट साहते
नसे जवळ माऊली
नाही छाया पदराची
दूध पाणी विचारीना
तरी शांत मुद्रा त्याची
आभाळाचे छत बाळा
कुशी देतसे धरणी
देव तारतसे बाळा
त्याची अगाध करणी
लांबवरी उभा बाप
त्याची दृष्टी बाळावरी
माय येता दूधपाणी
होई भेट उराउरी