अव्यक्त भावना
अव्यक्त भावना
अव्यक्त भावनांचे हे
वादळ मनी दाटले
जवळ तू असूनही
शब्द आज हे गोठले
किनारा हा शोधण्यासी
लाट ही दुरून येई
पाहताच तुला माझ्या
नयनास पुर दाटी
खट्याळ हा वारा मज
स्पर्श धुंद भारी वाटे
गुंतण्यास मीही त्याला
वेड्या जीवा धीर भासे
वाळूतही उमटले
चरणांचे बघा ठसे
कळे ना मला काहीच
भास तुझा होत असे
बघ चंद्रास गगनी
रात हीच धुंदावली
मिळण्या तयाच्या आता
झाली धुंद लता वेली