Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस

1 min
7.6K


कधी होतो वाऱ्या संग, ढोल-ताशांच्या गजर।

वीज कडाडून करी, मेघा अंबारी जागर।। 

वादळ-वाऱ्यात गेली सारी, झाड झुड घरदार।

नाही पाखरा घरटे, ना माणसास घर।। 

 आस आभाळ फाटलं,तस मनही विटलं।

गाई-गुर वासरांना कोणी खाटक, विकलं।। 

वाऱ्या-पावसात, कसं गारांनी झोडल।

भर दुपारी उन्हात, पावसाच येणं झालं।। 

 मारलं झोडलं, काय कुणाशी सांगावं।

ज्यां दिल त्यानं नेलं, असं मनाशी म्हणावं।। 

काय होत आमच्यापाशी, काय कुठून आणलं।

असं अवकाळी येणं, त्याच मानू या चांगलं।।


Rate this content
Log in