Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shilpa Joshi

Tragedy

3  

Shilpa Joshi

Tragedy

अवघे पाऊणशे वयोमान.....

अवघे पाऊणशे वयोमान.....

1 min
177


अवघे पाऊणशे वयमान

भासे बघा अजूनही लहान,

जिंकले खरंतर फिरंगी, हरून ती लढाई

किती वर्षे मिरवता पूर्वजांची तीच बढाई,

कुठं होतो कुठं आलो, अजून नाही उत्तर 

अजूनही चालूच आहे शोषितांची कत्तल,

सत्ता तिथे उदो उदोचं समीकरण,

इंग्रजांऐवजी आता आपलेच खेळतात राजकारण

सुंदरा अजूनही 'भरते' त्याच्या डोळा

नराधमाला शिक्षा देण्या वर्षं अजूनही जाती सोळा,

कुठेही टाकतो कचरा, देतो सोडून धार

बालकामगारांचे अजूनही होती बघा हाल

राव रंकाची दरी, वाढते अजून जरी,

जातीच्या आरक्षणाने पोखरली 'पात्रता' सगळी

अन्न, वस्त्र, निवाऱ्याला अजून तरसली अर्धी जनता,

अजूनही न भेटे त्यांना राजा जाणता

भ्रष्टाचाऱ्याच्या वाळवीने भंगला स्वप्नांचा बंगला,

कुणास ना ठाऊक कर्तव्य, जो तो हक्कासाठी आसुसला

कशास गाता गोडवे स्वातंत्र्याचे,

हे तर राष्ट्र झाले आता स्वैराचाराचे

दोघांमधली धूसर रेषा कळेल जेव्हा आम्हा,

तेव्हाच यशस्वी होईल 'स्वातंत्र्याचा' करारनामा

वैभवशाली इतिहास ना आम्ही वाचला, ना वाटे महान

'स्वातंत्र्याचे' आपुल्या अवघे पाऊणशे वयमान.....

चला टाकूया एक पाऊल पुढे,

असत्य,अन्याय,अत्याचाराविरुद्ध उभारू लढे...

घडवू सगळ्यांच्या स्वप्नातला भारत,

सत्य करू 'माझा भारत-माझा अभिमान' हे वचन..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy