Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

विवेक द. जोशी

Others

3  

विवेक द. जोशी

Others

अवचित भेटीत

अवचित भेटीत

1 min
196


अवचित भेटीत तुझिया मिठीत

जसा पाऊस भेटतोया मातीला

तसा चांद पुनवेचा ...हा...!

पाहण्या आतुर चांदणीला।।धृ।।


वनवा भडके रोमारोमात तारुण्याचा

ओळखणारे जिव काळजाच्या राणीचा

रे सख्या ही हरीण काया प्रेम माया

गंध कस्तुरीचा भिनलाया या प्रितीला...

...जसा चांद पुनवचा हा

पाहण्या आतुर चांदणीला।।१।।


गोऱ्या गाली खळी लाजते

किन् किन् कंगण मनी वाजते

माझं काळीज करतया धक् धक्

हा गुलाब ओठाचा भिडूदे ओठाला...

.....जसा चांद पुनवचा हा

पाहण्या आतुर चांदणीला।।२।।


दुरून दुरून अन् चोरून चोरून

का हो खेळ खेळता नजरचा आडून आडून

जवळ घेउनी नजर नजरेला देऊनी

विझवाना या कंदील दिवा वातीला

.....जसा चांद पुनवचा हा

पाहण्या आतुर चांदणीला।।३।।



Rate this content
Log in